संत योगीराज श्री विक्तू महाराज

 

 महाराजांचा जन्म संताची भूमी असल्या नागपूर जिल्ह्यात झाला .नागपुरात महाराजांचा जन्म 15 एप्रिल 1918 या दिवशी जन्म झाला.

महाराजांच्या जन्माच्या वेळची कथा अशी आहे, जन्म झालेला लहान बाळ त्वरित रडू लागते परंतु, महाराज सात दिवस आईचे दूध न पिता न रडता जिवंत राहिले. त्यांच्या आई-बाबांना समजतच नव्हतं की नक्की, काय चमत्कार आहे सात दिवसानंतर महाराज रडले.

   बालपणात त्यांची थोडी खोडकर वृत्ती होती .अर्थात त्यांचा शिक्षणापेक्षा अध्यात्मिक गोष्टीत जास्त कल होता. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी गुरुजींच्या डोक्यावर पाटी मारली व तेथून पलायन केले. आई-वडिलांना त्याच्या भविष्याची खूप चिंता वाटू लागली, नक्की आपला मुलगा काय करेल सांगता येत नाही.त्याच पुढे काय होईल.त्यांना खूप चिंता वाटायची.

  त्यानंतर महाराजांनी पुढचा प्रवास त्यांनी जंगलात राहून कंदमुळे खाऊन केला.त्यानंतर त्यांना घरच्यांनी घरी आणले. पुन्हा विकू बाबा कुठे निघून जाईल काही या भीतीने काही अघटीत घडू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी जाड लोखंडी बेडी त्यांच्या हाताला पायाला बांधली. महाराजांनी आई वडिलाचे आदेशाचे पालन करण्याचे ठरवले.आई-वडिलांची जर अशीच इच्छा असेल तर, मी ही बेडी मीआयुष्यभर काढणार नाही .आई वडिलांच्या आदेशचे पालन करीत महाराज एकाच जागेवर बसून बेडीवाल्या वित्तू महाराजांनी आपले आयुष्य व्यथित केले.

एकाच ठिकाणी बसून आयुष्य काढणे खूप कठीण आहे. हे पाहण्यासाठी गावातली लोक त्यांना पाहण्याकरिता येऊ लागले. तेव्हा महाराजांच्या तोंडातून येणाऱ्या शिव्याने लोकांचे कल्याण होऊ लागले.

   महाराजांचे मंदिरात कसे पोहचायचे महाराजांचा मंदिर हे भव्य दिव्य आहे. मंदिराचे बांधकाम हे विहाराप्रमाणे केले आहे 

प्रवेश करता सुरुवातीला बगीचा लागतो. मंदिरात आत शिरल्यावर मन अगदी प्रसन्न होते.मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान बुद्धांची सुवर्ण रंगांची मूर्ती आहे . त्याचप्रमाणे विक्तु महाराजांची समाधी व सुवर्ण रंगाची मूर्ती आहे . मंदिरात अन्नछत्र आहे. भक्तांसाठी भोजन व्यवस्था केलेली आहे . दूरवरुन आलेल्या भक्तांसाठी राहण्याची सुविधा देखील आहे.

  अनेक भोंदू बाबा असतात. त्यात फसू नये म्हणून बुद्धांनी तथागत राहिला सांगितले. बुद्ध हा धर्म तथागत असला तरी , प्रत्येक धर्मात मोक्ष अर्थात निर्वाण आहे .निर्वाण म्हटला की, योगी हे आलेच .अशा या योगीराज संत वित्तु महाराजांच्या मंदिराला नक्की भेट द्या .

मंदिरात कसे पोहचाल

 नागपूर पासून रस्तामार्गे- 30 किलोमीटर तर

वर्धा पासून- ४९ किलोमीटर नागपूरला पोहचल्यावर बुट्टीबोरीला उतरून टाकळघाटसाठी बरेच वाहन उपलब्ध आहे .

▪️ लेखिका 

▪️वर्षा वासुदेव भावसार ,मुंबई

टिप्पण्या