नांदेडच्या सायन्स कॉलेज मध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह संपन्न*


नांदेड दिनांक 30 ऑक्टोबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 च्या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह चे आयोजन करण्यात आले. या सप्ताह अंतर्गत सर्वांनी दक्षतेबाबत शपथ घेतली. भारतीय रिझर्व बँक वित्तीय समावेशन आणि विकास विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालय व सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री एन व्ही कल्याणकर यांनी कार्यक्रमात भ्रष्टाचाराचा विरोध करणे व राष्ट्राप्रती समर्पित राहणे याबद्दल माहिती दिली. दुसऱ्या प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून राधा तमांग यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे फंक्शन आणि इतिहास याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रबंधक श्री अनिल गचके यांनी बँकेतील कामाची जागरूकता कशी होईल व बँकेच्या संदर्भात तक्रारी ज्या असतात त्या कुठे नोंदवाव्या रिझर्व बँक ऑफ इंडिया व प्राध्यापक वर्ग यामधील सामंजस्य कसे होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतीय रिझर्व बँकेतील रोमानी रहांगडाले यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नोट रिफंड कसे करू शकाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की देशात सर्वत्र जो भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचाराचे वेगवेगळे रूप आपल्याला सर्वत्र दिसतात आपण होत असलेल्या भ्रष्टाचारापासून कसे जागरूक राहिले पाहिजे याबद्दल विचार व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या इतिहासाबद्दल प्रश्नमंजुषा घेण्यात आली यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक रेनी राजेश्वर राव व तेजस्विनी भद्रे मॅडम यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली त्यांना भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया तर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्य प्रा इ एम खिल्लारे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाच्या उप प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला, आयक्युएसी समन्वयक डॉ व्ही व्ही कुलकर्णी, प्रा एस एफ गोरे तसेच वेगवेगळ्या विभागातील विभाग प्रमुख, कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग सतर्कता जागरूकता सप्ताहात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज