नांदेड:(दि.२ नोव्हेंबर २०२३)
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अशा प्रकारे करावी की, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना देश-विदेशामध्ये रोजगार प्राप्त व्हावा तसेच उद्योग क्षेत्रातील यशस्वीतेसाठी प्रोत्साहन प्राप्त होईल; असे विचार श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी व्यक्त केले.
ते यशवंत महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्याशास्त्र या विषयाच्या विद्यापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
प्रमुख वक्ते डॉ.एम.के.पाटील यांनी, नवीन शैक्षणिक धोरणातील विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला तसेच त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे उद्योग व्यवसायांना चालना मिळेल; असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एस.बोडके आणि डॉ.साहेब शिंदे यांचे समायोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम.एम.व्ही.बेग यांनी केले आणि आभार डॉ.सचिन पाटील यांनी मानले.
या कार्यशाळेचा समारोप उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रो. सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार डॉ.रमेश चिल्लावार यांनी मानले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुरेश तेलंग, डॉ.अंजली जाधव,सौ. मनीषा बाचोटीकर आदींनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा