मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगाम २०२३/२४ मध्ये मौजे आंबुलगा येथील शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली होती निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्याना दि.३१/१०/२३ रोजी हरभरा (विक्रांत) जातीचे बियाणे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष आंबुलगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद पाटील हे होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कृषि अधिकारी गिरी संभाजी साहेब यांनी केले व उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री. संजय फुल्लारी साहेब यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी बळवंत झाडे, देविदास पा.झाडे, गोविंद पाटील, हणमंत मंत्री, सुभाष देशटवाड, पोगुलवाड, शंकर भायेगावे, एकनाथ कलेटवाड, हणमंत झाडे आदी शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा