नांदेड :- मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा टेबल-टेनिस असोसिएशन यांचे सहकार्याने चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल-टेनिस (14,17 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.30 ऑक्टो. ते 01 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत संपन्न होत असून या स्पर्धेचे उदघाटन आज दि.31 ऑक्टोंबर,2023 रोजी सकाळी 11.00 वा.डॉ.महेशकुमार डोईफोडे (आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड) यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन .महेश वडदकर (निवासी उपजिल्हाधिकारी,नांदेड), जगन्नाथ लकडे (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड),.सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू), .संजय कडु (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), गणेश माळवे (राज्य संघटना प्रतिनिधी), डॉ.अश्विन बोरीकर (जिल्हा सचिव टे.टे.)राजेश मापेकर (पंच प्रमुख) आदि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मा.महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, शालेय जिवनात खेळ हा अतिशय महत्वाचा घटक असुन खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन आपले करीयर घडवावे असे सांगीतले. तसेच मा.निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी म्हणाले की, खेळाडूनी चांगले कौशल्य दाखवून आपल्या जिल्हा, विभाग व राज्याचे नांव लौकीक करावे.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक मा.श्री.जगन्नाथ लकडे यांनी केले व सुत्र संचलन कु. सुष्टी रावनगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन .संजय बेतीवार (क्रीडा अधिकारी) यांनी केले.
या स्पर्धेकरीता निवड समिती सदस्य/ पंच म्हणुन 14 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धेकरीता . अनिल बंदेल (राज्य क्रीडा मार्गदर्शक पुणे), श्री.अजय कांबळे (एन.आय.एस.नागपूर), गणेश माळवे (संघटना प्रतिनिधी,परभणी) व 17 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धेकरीता निवड समिती सदस्य म्हणुन सचिन पुरी (राज्य क्रीडा मार्गदर्शक, संभाजीनगर), असद सय्यद (राज्य क्रीडा मार्गदर्शक पुणे), व संजय कडु (संघटना प्रतिनिधी रायगड), श्रीमती एम.एस.खान तर पंच म्हणुन मनोज निकाळजे, राहुल यश, अजय कांबळे, सुमित कुलदीप, निखील गवळी, पुजा जोरवर, योगेश्वरी कुलकर्णी, आयुष आठवले, प्रणव अडबलवार, कैवल्य गिरगावकर, हेमंत नरवाडे, सुष्मीता जाधव, आयुष बोरीकर, आनंद नरवाडे, श्रेया देशमुख, श्रृध्दा रावनगांवकर, प्रतीक एडके, केदार जामकर आदीनी काम पाहीले आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी .संजय बेतीवार,प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक . बालाजी शिरसीकर ,चंद्रप्रकाश होनवडजकर, (क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख) वरिष्ठ लिपीक .संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोयर, उत्तम कांबळे, सुभाष धोंगडे, मोहन पवार, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे व टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले.
सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा