नांदेड 31 ऑक्टोबर 2023 रोजी सायन्स महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजकीय सामाजिक नेते तसेच राष्ट्रीय एकात्मता अखंडता सुरक्षेसाठी धडपडणारे व्यक्तिमत्व असे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी होतात्म पत्करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृती दिनी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेले योगदान असे स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळली जाते व भारताच्या सर्वात सामर्थ्यशाली पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेसाठी होतात्म पत्करणाऱ्या प्रियदर्शनी स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून आज आपण आयोजित करत आहोत असे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी तसेच स्टाफ सेक्रेटरी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाचे संयोजन करून प्रस्तावना मांडली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे सामाजिक व राजनीतिक कार्य आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व व त्यांनी देशासाठी पंतप्रधान पदावर असताना चे केलेले कार्य याबद्दल माहिती प्रस्तुत करून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी भाषणात अध्यक्षीय समारोप केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक थोरात व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्रा राजेश्वर राव रायनी, डॉ पी एस सुतकर, प्रा आर एम आचेगावे, डॉ एस पी चव्हाण, प्रा एस एम कदम, प्रा एस आर दूलेवाड, प्रा नरवाडे, ए के गाडगे, प्रा आर व्ही गावित, व इतर कर्मचारी वर्ग मध्ये आधिक्षक अर्चना कुलकर्णी,श्री संतोष पांडे, श्री राम पवार, गणेश घाटोळे, ए एम थोरात, गणेश कुलकर्णी, महेश डोंगरकर, शंकर पतंगे आदीं अन्य कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांनी प्रतिमे स पुष्प अर्पित करुन आपली उपस्थिती दर्शविली
addComments
टिप्पणी पोस्ट करा