स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!


सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती श्री रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे कुलपती श्री रमेश बैस यांनी नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वीकारावा, असा आदेश काढलेला आहे. दि. 6 नोव्हेंबर 2023 पासून पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत डॉ. प्रकाश महानवर हे नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार पाहतील असे आदेशात म्हटले आहे. 

माननीय कुलपती श्री रमेश बैस यांनी दिलेली जबाबदारी निश्चितच समर्थपणे पार पाडेन, असे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या