टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट २ चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न, कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामासाठीची सर्व तयारी पूर्ण.

 

लातूर प्रतिनिधी १९ आक्टोंबर २३ :
परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात
आर्थिक बदल व्हावा यासाठी साखर उदयोग क्षेत्रात अदययावत तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने सन २०२० मध्ये सुरू करण्यात आलेला  देवीनगर सायखेडा येथील
टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट २ च्या चौथ्या गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज
झाला असून गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत
पूजा करून ट्वेन्टी वन शुगर्स युनिट २ कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन
करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील सायखेडा तालुक्यातल्या देवीनगर येथे सुरू करण्यात
आलेल्या टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट २ चे यापूर्वी ३ गळीत हंगाम यशस्वी
ठरले आहेत. सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या चौथ्या गळीत हंगामासाठी कारखाना
व्यवस्थापनाकडून आवश्यक ती सर्व तयारी केली गेली असून ट्वेन्टी वन
शुगर्सची यंत्रणा  सज्ज ठेवण्यात आली आहे.
ट्वेन्टी शुगर्स लि.युनिट २ देवीनगर सायखेडाचा २०२३-२४ करिता गळीत हंगाम
लवकरच सुरू होत आहे. या अनुषंगाने गुरूवार दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी
कारखाना साईट, देवीनगर सायखेडा ता. सोनपेठ जि.परभणी  या ठिकाणी गळीत
हंगाम २०२३-२४ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ टवेन्टिवन शुगर्स लि.चे व्हा.
चेअरमन विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी संचालक श्री.
सुभाष पाटील व सौ.मालन पाटील उभयताच्या हस्ते विधीवत पूजन करून संपन्न
झाले.
सोनपेठ तालुका तसेच परभणी जिल्हयासह नजीकच्या परीसरातील अतिरीक्त ऊसाचा
प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरीता राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने साखर उदयोगातील
अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून टवेन्टिवन शुगर्स लि.युनीट २ ची २०२०
मध्ये सुरुवात करण्यात आली. सोनपेठ तालुक्यासह परभणी जिल्हयातील अधिकाधिक
ऊसाचे गाळप करणे या कारखान्यामूळे शक्य झाले. परभणी जिल्हा तसेच
परीसरातील ऊस  उत्पादक शेतकऱ्यासाठी ट्वेन्टी वन शुगर्स युनिट २ देवीनगर
सायखेडा हा कारखाना अत्यंत फायदेशीर ठरला आहे. लवकरच सुरू होत असलेल्या
गळीत हंगामाकरिता कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी ट्वेन्टी
वन शुगर्सच्या युनिट  २ च्या सर्व विभागानी जय्यत तयारी केली आहे. सर्व
सभासद व ऊस उत्पादकांच्या उसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी पूर्ण नियोजन
करण्यात आले असून टवेन्टिवन शुगर्स लि.युनिट २ कडून हंगामात गाळप
झालेल्या उसाला चांगला ऊसदर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून
सांगण्यात आले आहे. या प्रसंगी खातेप्रमुख व विभाग प्रमुख सर्वश्री
गोविंद देशमुख, श्री.रसाळ, श्री.निलेश माने, श्री.धर्मेंद्र गदाळे,श्री.
तुकाराम गडदे, श्री.अजित देशमुख,श्री.घुगे,श्री.जि.टी.मुंडे,श्री.विनोद
औटे,श्री.स्वप्नील कुंभार, श्री.आर.आर.जाधव,श्री.ज्ञानोबा शिरसाठ,
श्री.संजय  साळुंके यांच्यासह ट्वेन्टी वन शुगर्सचे अधिकारी,
कर्मचारी,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज