कंधार प्रतिनिधी d .kadam
कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते डॉ. जाधव दवाखान्यापर्यंतचा रस्ता शंभर फुटाचा करण्यात यावा. यासाठी आमरण उपोषण, आंदोलने करण्यात आली. शेवटी ह्या रस्त्याचा प्रश्न न्याय प्रविष्ट झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील काही अतिक्रमणे निघाली आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात. गेल्या काही दिवसापासून खुले आमपणे कंधारच्या चौका चौकात दारुच्या दुकानाचे अड्डे सुरु केली आहे. माफियाने एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. त्यामूळे जिथे दिले जातात ज्ञानाचे धडे तिथे सुरु झाले मटक्याचे आकडे अन् देशी दारूचे अड्डे अशी चर्चा ऐकवयास मिळत आहे.
शहर परिसरातील अनेक ठिकाणी मटका सुरू असणारा अचानक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात खुलेआम चालू झाला आहे. ज्याप्रमाणे यात्रेत दुकाने थाटली जातात त्याप्रमाणे शाळेच्या मैदानात कब्जा करून कमीत कमी १० ते १५ मटक्याचे व देशी दारूचे दुकाने खुलेआम कोणी पाल टाकून तर कोणी चक्क पत्रा मारून दुकाने बसवली आहेत. मटक्यासह अवैध धंदे राजरोसपणे सुरु झाले असून मटका तर कधी नव्हे पहिल्यांदा उघड उघड सुरु झाला आहे. मटक्यामुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत तर पोलिसांचे संसार फुलले जात आहेत. कल्याण मटक्यामुळे पोलिसांचे चांगलेच 'कल्याण' झाले असून, गोरगरीब भिकेला लागले आहेत. शहरातील विविध परिसर व भागात मटक्याचे दुकाने थाटले असून पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यावर काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा