मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे वास्तव्यास असलेले शेख कुटुंब तब्बल ७६ वर्षांनंतर दि.१५ ऑक्टोंबर रोजी आपले मुळगाव बेटमोगरा येथे भेट दिली. यादम्यान गावातील अनेक ठिकठिकाणी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
१९ व्या शतकात बेटमोगरा या गावात एक मोठी बाजारपेठ होती.अनेक मोठमोठे उद्योगधंदे या गावात असल्यामुळे या गावाला अनेक गावांच्या संपर्क होता. त्याच काळात मदारसाब बाबनसाब यांनीही आपले कापड दुकान व किराणा दुकान थाटले होते आणि तो दुकाने परिसरात प्रसिद्धही होती. मदारसाब बाबनसाब यांना मोहम्मद हुसेनसाब व मोहम्मद इक्बाल अहमद साब अशी दोन लहान मुले असून तेही आपल्या वडिलांच्या व्यवसायात गुंतलेली होती. त्यांच्या व्यवसाय सुरळीत चालू होता मात्र कालांतराने मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पोलीस ॲक्शन कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईत अनेक दंगली घडून आल्या त्यातच हिंदू-मुस्लिम वादाची ठिणगी पेटली अशा खडतर परिस्थितीत मदारसाब बाबनसाब यांनी गावातील आपले मित्र रामभाऊ स्वर्णकार व मांगीलाल पल्लोड यांची मदत घेतली व या दोन जिवलग मित्रांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप देगलूर पर्यंत सोडल्यानंतर मदारसाब बाबनसाब यांनी आपल्या आपल्या कुटुंबाला घेऊन तत्कालीन आंध्रप्रदेश विद्यमान तेलंगणा राज्यातील निझामाबाद या शहरात वास्तव्यास राहिले व तेथे आपल्या कापडाचे उद्योगधंदे पुन्हा थाटले व हळूहळू आर्थिक प्रगतीत सुधारणा झाली. व कालांतराने मदारसाब बाबनसाब यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या व्यवसाय त्यांची दोन मुले मोहम्मद हुसेनसाब व मोहम्मद इक्बाल अहमद साब यांनी सांभाळली व व्यवसायात उंच भरारी घेत निझामाबाद शहरात अनेक मोठमोठे कापडाचे व्यवसाय थाटलेत. येवढे सगळे करत करत आपल्या पुर्वजांचे गाव आपली जन्मभूमी बघण्याचा मोह या दोन भावंडांना आवरेनासा झाला. त्यांनी बेटमोगरा येथील मुस्लिम समाजातील व्यक्तींना संपर्क करुन गावात आपल्याकडून जेवणाच्या कार्यक्रम आयोजित केला व त्या कार्यक्रमात मोहम्मद हुसेनसाब व मोहम्मद इक्बाल अहमद साब यांनी आपल्या कुटुंबासह दि.१५ ऑक्टोंबर रोजी उपस्थित राहून आपल्या वडिलांना मदत केलेल्या रामभाऊ स्वर्णकार यांचे नातू व्यंकट पोतदार व मांगीलाल पल्लोड यांच्या मुलगा ओम पल्लोड यांची सदिच्छा भेट घेत गावातील ठिकठिकाणी भेट देत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यादरम्यान मोहम्मद हुसेनसाब व मोहम्मद इक्बाल अहमद साब यांच्या गावातील सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा