कंधार प्रतिनिधी कंधार शहरातील सिध्दार्थ नगर भागात डॉक्टर दापत्यांचे नावाजलेले हॉस्पिटल आहे. एक स्त्री रोग तज्ञ तर दुसऱ्या बालरोगतज्ञ आहे. सदरील दवाखान्यात महिला प्रसूती झाल्या नंतर तिच्या नवजात बाळाला सुट्टी देण्यात आली असता च्या बालाच्या डाव्या हाताला सुई लावण्यात आली होती. ती काढताना येथिल कर्मचारी यानी या नवजात अभ्रकचा चक्क अंगठाच कापण्यात आला. यामुळे दवाखाना परिसरामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईका मदे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घडलेला प्रकार असा की तालुक्यातील उमरज येथील आकाश भुत्ते हे आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसुति झाली आणि मुलगा झाला. अन्न भुत्ते कुटुंबाला आनंद गगनात मावेनासी झाला. या बालाला सातव्या दिवशी त्यांना सुट्टी देण्यात आली. बाळाच्या हाताला सुई लावण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने २३ रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान पट्टी काढायला जाऊन चक्क डाव्या हाताचा अंगठाच कापला. यामुळे दवाखान्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्याच दिवशी संध्याकाळी बाळाला नांदेड येथे हलविण्यात आले. २४ रोजी बाळाचे वडील आणि त्यांचे नातेवाईक याबाबतची विचारणा करण्यासाठी दवाखान्यात आले. यावेळी दवाखान्यात गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. काही जेष्ठ नागरिक व पोलिसांच्या मदतीने यावर तोडगा काढण्यात आला. चुकीमुळे जी गोष्ट घडून गेली ती वापस तर येणारं नाही म्हणुन पुढील खर्चासाठी लागणारी जी मदत आहे ती डॉक्टरांनी द्यावी. असा तोडगा काढून प्रकरण मिटविण्यात आले.
ReplyForward |
addComments
टिप्पणी पोस्ट करा