ऑलिंपिक मध्ये टेनिसव्हाॕलीबाॕल या खेळाचा लवकरच समावेश-डाॕ.प्रा.व्यंकटेश वांगवाड* परभणी, ठाणे, पुणे, बुलढाणा नाशिक संघांनी विजेते ठरले


 


भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या हस्ते बक्षीस वितरण 

शिर्डी (. ) टेनिसव्हाॕलीबाॕल महाराष्ट्र असोशिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिसव्हाॕलीबाॕल असोशिएशनच्या संयुक्त विदयमाने २५वी राज्य टेनिसव्हाॕलीबाॕल सब ज्युनिअर व ज्युनिअर स्पर्धा शिर्डी येथे नुकतीच पार पडली.या स्पर्धेचा समारोप शिर्डी येथिल सैनिकी आरामगृहाचे प्रमुख सुभेदार कृष्णा लोटेकर यांच्या शुभहस्ते झाला.या प्रसंगी टेनिसव्हाॕलीबाॕल खेळाचे जनक डाॕ.प्रा.व्यंकटेश वांगवाड म्हणाले की हा खेळ भारतीय असुन लवकरच आॕलिंपिक मध्ये याचा समावेश होणार आहे तो पर्यत या खेळाचा प्रसार व प्रचार असाच सुरु राहील. खेळाडुंना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले लवकरच पुणे येथे बालेवाडी या ठीकाणी राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन होणार असुन त्या मध्ये २०राज्ये सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन १८जिल्हातील २००खेळाडु व ५०प्रशिक्षक सहभागी झाले.

या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी टेनिसव्हाॕलीबाॕल फेडरेशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते दीलीप घोडके,शिर्डी येथिल उदयोगपती सुनिल सोनवणे,हवालदार घनश्याम उपस्थित होते.महाराष्ट्र टेनिसव्हाॕलीबाॕलचे सचिव गणेश माळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन स्पर्धेचीचे माहीती दीली.यावेळी अहमदनगर जिल्हा टेनिसव्हाॕलीबाॕलचे असोशिएशनचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी सर्वाचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश बडजातेसर यांनी केले.

या प्रसंगी टेनिसव्हाॕलीबाॕलचे राज्य कोषाध्यक्ष डाॕ.दिनेश शिंगारम,तांत्रिक समितेचे चेअरमन प्रफुल्ल बन्सोड,रेफरी बोर्डाचे सचिव सतिश नावाडे,मुंबई विभागिय सचिव अशोक शिंदे,विविध जिल्हा सचिव देवानंद नेमाणे,(बुलढाणा),शाम भोसले(पुणे शहर),रामेश्वर राठोड (अकोले),नावेद पठाण(हिंगोली) तेजस पाटील(मुंबई उपनगर),शेख खमर(बीड)प्रमोद महाजन(संभाजी नगर) आदी उपस्थित होते.अहमदनगर जिल्हा टेनिसव्हाॕलीबाॕलचे सचिव शिवराज पाळणे यांनी आभार मानले.

या स्पर्धात पंच म्हणून निनाद रहाटे मुंबई उपनगर,संतोष शिंदे परभणी,निलेश माळवे परभणी, राहुल पेटकर लातूर, सचिन मुखरे अहमदनगर,किरण घोलप नाशिक, गणेश कलुंगल नाशिक,बंडू जमदाडे नाशिक, प्रज्वल पिंपळकर नाशिक,अभिषेक सोनवणे नाशिक, साहिल जोगदंडे नाशिक,सोमनाथ पोपळे - परभणी यांनी काम पाहीले.राष्ट्रीय स्पर्धातील संघ निवडी करीता निवड समिती सदस्य म्हणून आशिषओबेरॉय(मुंबई), गणेशकडाळे( नाशिक), नावेद पठाण (हिंगोली),शिवराज पाळणे, अहमदनगर हे उपस्थित होते.स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे

*सब ज्युनिअर* मुले-

१)बुलढाणा-विजयी

२)ठाणे -उपविजयी

३)हींगोली-तृतीय

                मुली.

१)पुणे शहर-विजयी

२)नासिक-उपविजयी

३)पुणे जिल्हा -तृतीय

         मिश्र दुहेरी

१)परभणी-विजयी

२)पुणे शहर-उपविजयी

३)ठाणे-तृतीय

*ज्युनिअर गट* मुले

१)ठाणे -विजयी

२)परभणी-उपविजयी

३)यवतमाळ-तृतीय

                मुली

१)परभणी-विजयी

२)नासिक-उपविजयी

३)संभाजीनगर-तृतीय

              मिश्र दुहेरी

१)नासिक-विजयी

२)परभणी-उपविजयी

३)बुलढाणा-तृतीय

 या स्पर्धाला शिर्डीतील क्रीडाप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या