राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण देवगिरी प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रचंड योगदानाचे व पराक्रमाचे स्मरण व्हावे म्हणून राष्ट्र जागरणाच्या निमित्तामे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एकभाग म्हणून श्री रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी सोमवार दि.9 ऑक्टो.2023 रोजी स.10 वा. माहूरचे योगी प. पू. श्यामबापू भारती महाराज यांचे हस्ते शौर्य जागरण रथातील छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून रथ यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्री कृष्ण जन्माष्टमी 2024 ला 60 वर्षे पूर्ण होत आहे, तसेच छत्रपतींनी स्थापना केलेल्या हिंदवी साम्राज्याला 350 वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष सुरेश महाराज,धर्माचार्य नरसिंग महाराज, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, विशेष निमंत्रित अनिरुद्ध केंद्रे, मठमंदिर प्रमुख रमेशचंद्र दारमवार, किरण ठाकरे, बजरंगदल संयोजक सोनू चौधरी, तालुका संघचालक अनिल काण्णव, संतोष राचेवार, कुंदनसिंह परिहार,नंदकुमार जोशी आदींची उपस्थिती होती. संस्थांनच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी वरील सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा