'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्षावास समाप्ती सोहळा व भव्य अन्नदान वाटप; नालंदा बुद्ध विहार समिती व अण्णा भाऊ साठे सभागृह समितीचा पुढाकार

 

नांदेड -  नवीन कौठा परिसरातील नालंदा बुद्ध विहार समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह समिती आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ वाचनाचा समारोप व भव्य भोजनदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भंते संघप्रिय, भिक्खूनी आर्याजी, दिलीप कंदकुर्ते, माजी नगरसेवक राजू गोरे, राजकुमार सिंघ गाडीवाले, बालीभाऊ कांबळे, कांचन जोंधळे, प्रज्ञाधर ढवळे, सुनील अनंतवार, प्रकाश ढवळे नागलगांवकर, पंचफुला वाघमारे आदींची उपस्थिती होती.


         या कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य रॅली काढून वंदनीय भंतेजी यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. समस्त जनास भव्य अस अन्नदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पंचरंगी धम्म ध्वजारोहण हे मा.नगसेवक राजु गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे प्रज्ञाधर ढवळे सर व प्रकाश ढवळे यांनी जनतेस मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निष्काम सेवा प्रतिष्ठानचे राजकमलसिंघ गाडीवाले हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत युवा नेते बाली भाऊ कांबळे व  भीम कन्या कांचन राजेश जोंधळे यानी आपली उपस्थिती दर्शवली.

        कार्यक्रमात विशेष सत्कारमूर्ती म्हणून विलास गजभारे सर (क्षेत्रीय कार्यालयीन अधिक्षक मनपा नांदेड झोन क्र ( 6) आणि राष्ट्रीय कलाल गौड युवा संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ अनंतवार यांचा मंडळातर्फे बुद्ध प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी यशोधरा महिला मंडळ व नवयुवक भीम जयती मंडळ तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक नालंदा बुद्ध विहार समिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह समिती व सप्तरंगी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रभागातील युवक नागरिक तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात आपलं परिश्रमरूपी दान करून मंडळास सहकार्य केले.
टिप्पण्या