स्वस्त आणि मस्त उबदार वस्तुंच्या दालनाचे उद्घाटन संपन्न

 

नांदेड,(प्रतिनिधी)-हिंगोली गेट जवळील सचखंड गुरूद्वारा मैदानात तिबेटीयन बाधवांच्या गरम ऊलन शॉल, स्वेटर, जर्शी, हातमोझे, पायमोझे, मफलर, विविध रंगाच्या व ढंगाच्या टोप्या अदि स्वस्त आणि मस्त वस्तूंच्या दालनाची सुरूवात नांदेड भूषण, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते बालरोग तज्ज्ञ डॉ.हंसराज वैद्य व सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंघजी बुंगई यांच्या शुभ हस्ते फित कापून मोठ्या थाटामाटात झाली.                  
या प्रसंगी गुरूद्वारा बोर्डाचे सहाय्यक अधिक्षक ठाकूर सिंघजी बुंगई, हरपाल सिंघजी, प्रेमसिंघजी रामगडीया, तिबेटीयन बंधू भगीनी तथा नांदेड नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. तिबेटियन बंधूनी मान्यवर अथितींचे शॉल, मिठाई देवून गुलाब पुष्प उधळून जंगी स्वागत केले. तिबेटीयन महिला व पुरूष बंधू भगीनींनी त्यांच्या सांस्कृतिक पद्धतीनी विशेष सामूहिक नृत्य व गीत सादर केले. मान्यवरांनीं त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज