आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शानदार उद्घाटन


*अंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेतूनच भारतीय संघाचे भावी खेळाडू घडतात* मा आ .हरिभाऊ काका लहाने  


सेलु( ) अंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेतूनच भारतीय संघाचे भावी खेळाडू घडतात असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड झोन क्रिकेट स्पर्धेचा दि. २८ऑक्टोबर, मंगळवार रोजी स.११ वा. उद्घाटनप्रसंगी केले . 

       सेलु येथील या मैदानावर अनेक उत्कृष्ठ क्रिकेट च्या स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धात अनेक रणजी खेळाडू खेळून भारतीय क्रिकेट संघात त्यांनी स्थान मिळवले असे उद्घाटनप्रसंगी माजी आ. हरीभाऊ काका लहाने म्हणाले.  

        कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. कोठेकर (चिटणीस, नू.वि.शि.सं. सेलू.) उद्घाटक मा. आ. हरीभाऊ काका लहाने (माजी आमदार, सेलू.)मा. जयप्रकाशजी बिहाणी (सहसचिव, नू.वि.शि.सं. सेलू)

प्रमुख अतिथी मा. विनोदभाऊ बोराडे (माजी नगराध्यक्ष, न.प.सेलू.)मा.प्रभाकरदादा सुरवसे (माजी उपनगराध्यक्ष, न.प.सेलू). संदीप लहाने (सचिव, नितीन क्रिकेट अकॅडमी, सेलू) डॉ. यु.सी. राठोड (प्राचार्य, नूतन महाविद्यालय, सेलू)

डी झोन समितीचे सचिव प्रा. डॉ. मिनानाथ गोमचाळे, प्रा.साहेबराव देवकते, प्रा. मदन ठाकूर, प्रा. डॉ. संतोष कोकीळ, सतिश नावाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्वामी रामानंद तीर्थ व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक : डॉ. कमलाकर कदम,

डॉ. व्ही. के. कोठेकर अध्यक्षीय समारोप केला. 

         सकाळी ८ वा नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर 

अनिकेत पालेपवाड-(नायब तहसीलदार,सेलू )अशोक जटाळ-(पोलिस उपनिरीक्षक,सेलू) ॲड दत्तराव कदम (तालुका अध्यक्ष भाजपा)प्रा. प्रवीण सोनवणे ,प्रा. दयानंद जामगे , यांच्या हस्ते श्री फळ वाढुन नूतन महाविद्यालय सेलू वि. नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ दरम्यान झाला. यात औंढा नागनाथ संघ ७६ धावाने विजय प्राप्त केला. 

बोर्डीकर मैदानावर दुसरा सामना

न्यु मॉडेल न्यू मॉडेल कॉलेज हिंगोली वि. सरस्वती फार्मसी महाविद्यालय कुर्तडी दरम्यान होऊन कुर्तडी ६ गडी राखून विजय प्राप्त केला. 

तिसरा सामन्यात शिवाजी महाविद्यालय परभणी १५ षटकात १९८ धावा केल्या तर गुरुबुध्दी महाविद्यालय पुर्णा संघ २४ धावांत तंबूत परतला तर शिवाजी महाविद्यालय १७४ धावांनी विजयी झाला.

 स्पर्धेत १० महाविद्यालय संघाने सहभाग नोंदविला आहे. 

      आभार प्रदर्शन: प्रा. नागेश कान्हेकर, सूत्रसंचालन: प्रा. राजाराम झोडगे, 

स्पर्धेस पंच म्हणून राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, सुरज शिंदे, कपिल ठाकुर, मिर्झा अवेज, वसीम भॉई, अक्रमभॉई, जिशान सिद्दीकी, 

     स्पर्धा यशस्वीतेसाठी गणेश माळवे, प्रा. रविंद्र कदम, प्रा. श्री कांत देशमुख, प्रा. प्रविण खरात, संतोष शिंदे, दत्ता रिठ्ठे,

टिप्पण्या