मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बळीराजा विकास पॅनलच्या दणदणीत विजय


१८ जागांपैकी १७ जागेवर भाजपाचे वर्चस्व 

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाने काटे की टक्कर देण्यासाठी आमनेसामने धडकले होते. यात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी कंबर कसून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यात ८ ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत भाजपाच्या दणदणीत विजय झाला असून आमदार डॉ.तुषार राठोड व माजी जि.प.सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वात बळीराजा विकास पॅनलने १८ जागांपैकी १७ जागेवर घवघवीत यश मिळवून मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

                  नुकत्याच होऊ घातलेल्या मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाने १८ जागांपैकी १७ जागेवर दणदणीत विजय मिळवून एक हाती सत्ता मिळवली आहे तर महाविका आघाडी व मित्र पक्षांना एका जागेवरच समाधान मानावे लागले. या निवडणूकीला दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची निवडणुक केली होती. या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असून यात सेवा सहकारी संस्थातील सर्वसाधारण मतदार संघातील निवडून आलेले डॉ.व्यंकटराव सुभेदार, बालाजी पाटील, विठ्ठलराव पाटील, शिवाजी बोडके, डॉ.विरभद्र हिमगीरे,जिवनराव नाईक व गुडेराव गुबनरे तर विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून नारायण सातगीर व इतर मागास प्रवर्गाच्या मतदारसंघातून व्यंकटराव पाटील तमशेट्टे व महिला मतदार संघातून शकुंतलाबाई कोंडलवाडे,सुनिता नरोटे हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाचे नागनाथ जाधव व जयसिंग देवकत्ते हे विजयी झाले तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून व्यंकटराव लोहबंदे यांच्या विजय झाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर यांच्या विजय झाला आहे.आडत व्यापारी मतदारसंघातून पांडुरंग महाजन व नंदकुमार सत्तापूरे हे विजयी झाले आहेत. हमाल मापारी मतदारसंघातून नागनाथ गायकवाड हे एकमेव महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत

▪️दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर यांच्या तब्बल दुसऱ्यांदा संचालकपदी निवड

मुखेड कृउबा समितीच्या निवडणुकीत बळीराजा विकास पॅनलने १८ जागांपैकी १७ जागेवर दणदणीत विजय मिळवला असून यात आ.डॉ.तुषार राठोड व माजी जि.प.सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर यांची कृउबा समितीच्या निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून १३५ मतांनी दणदणीत विजय झाला असून त्यांची तब्बल दुसऱ्यांदा संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने बेटमोगरा येथील ग्रामस्थांच्या वतीने दत्तात्रय पा.बेटमोगरेकर यांच्या सहित युवा नेते बालाजी पा.बेटमोगरेकर यांची ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या