यशवंत च्या हिंदी विभागास विद्यापीठाचे सुवर्ण पदक*

 


नांदेड:(दि.२० ऑक्टोबर २०२३)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.गायत्री रमेश सोळंकी हिस बी.ए.हिंदी ऐच्छिक या विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत उन्हाळी २०२३ परीक्षेत गुणानुक्रमे सर्वप्रथम आल्याने विद्यापीठाद्वारे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.चंद्रभान वेदालंकार स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

          या सुवर्णपदकाचे प्रायोजक हिंदी साहित्याचे अभ्यासक,भाषांतरकार प्रो.डॉ.सूर्यनारायण रणसुभे हे आहेत. हे पुरस्कार वितरण १८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात संपन्न झाले. 

          या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, हिंदी विभाग प्रमुख प्रो.संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते हिंदी विभागातर्फे 'यशवंत हिंदी भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले.

          याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक श्री.संदीप पाटील, अधीक्षक श्री.कालिदास बिरादार, श्री.गजानन पाटील, डॉ.विद्या सावते, डॉ.अजय गव्हाने आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज