मुंबई दि.२: मुंबईतील क्रीडा क्षेत्रातील नामवंत दि.नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनातील कामगार कर्मचाऱ्यांना अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने १० हजार रुपये भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे.या क्लब मध्ये जवळपास 386 कामगार असून सर्वांनी मोठ्या जल्लोषात या पगारवाढीचे स्वागत केले आहे.
या पगारवाढीचा तिढा गेले काही महिने सुटत नव्हता,पण युनियन अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी कुशलतेने यशस्वी तडजोड घडवून आणली आणि नुकताच पगार वाढीचा करार घडवून आणला. कराराचे वैशिष्ट्य म्हणजे कित्येक वर्षे कामगारांची वार्षिक इन्क्रिमेंट बंद होती, ती आता या कराराने सुरू झाली आहे.या करारामुळे मूळ पगारातील बेसिकवर प्रत्येक वर्षी ५ टक्क्यांने वाढ होणार आहे. याशिवाय वार्षिक प्रवास भत्ता, जेवणाचा भत्ता,सणांसुदीसाठीचा भत्ता, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना जवळपास ३लाख रुपये पर्यंत मेडिक्लेम या सुविधा करारा द्वारे मिळणार आहेत.महत्वाचे म्हणजे क्लब मधील रोजंदारीवरील कामगारांना कायमरुपी सेवेत घेण्यात येणार आहे.युनियनचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या भरघोस पगारवाढीचे स्वागत केले आहे.करारावर अध्यक्ष आमदार सचिन अहिर,युनिट प्रमुख उपाध्यक्ष मा.नगरसेवक सुनील अहिर तर व्यवस्थापनाच्या वतीने सेक्रेटरी अतुल मारू,चेयरमन अमित मेंढा,उपसीईओ मोहन गिडवाणी,एच आर मॅनेजर एम.के.बरसे,प्रतिनिधी -संदीप सपाटे, मनोज महाडिक,अरुणकुमार मिश्रा, दीपक परदेशी,आशा चुडासमा,सतीश मोरे, रॉनी फर्नांडिश, सत्येंद्र सिंग, प्रमोद तरळ, सतीश साईल, संजय बिरवटकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.उपाध्यक्ष सुनिल अहिर, आणि युनिट लीडर मनोज महाडीक यांचे या वेतनवाढीसाठीचे प्रयत्न लक्षणीय ठरले आहेत.•••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा