पुणे (. ) भारतीय टेनिसव्हॉलीबॉल महासंघाच्या मान्यतेने टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व पुणे जिल्हा टेनिस व्हाॅलिबाॅल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ वी राष्ट्रीय सबज्युनियर व ज्युनिअर टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पुणे येथे संपन्न झाली बालेवाडी या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने घवघवीत यश संपादन केले
महाराष्ट्र राज्य सबज्युनियर मुले गटात सुवर्णपदक तर मुली व मिश्र दुहेरीत रौप्यपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. .
बक्षीस वितरण सोहळ्यास क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, टेनिसव्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय महासंघाचे सरचिटणीस डॉ.व्यंकटेश वांगवाड, महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, डॉ. रितेश वांगवांड राज्य चेअरमन गणपतराव बालवडकर, धर्मवीरसिंग जडेजा, डॉ. दिनेश शिगांराम, प्रफुल्ल कुमार बन्सोड, निवृत्ती काळभोर, कमलाकर डोके,यांची उपस्थिती होती
सबज्युनियर मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश व गुजरात संघावर दणदणीत विजय प्राप्त करून अंतिम फेरीत तामिळनाडू संघास( २-०) सेट ने मात करून महाराष्ट्र सुवर्णपदक विजेता ठरला . सबज्युनिअर मुले:
वायाळ ओम,वायाळ वरद
जाधव आदित्य ,सज्जन मंन्थन, पाळणे वरद, जाधव आयुष,
प्रशिक्षक :-नावेद पठाण ,(हिंगोली) संदिप भोसले (पुणे)
तर सबज्युनियर मुलीच्या गटात साखळी फेरीत सर्व सामने जिंकून गुजरात सुवर्णपदक तर दुसर्या स्थानावर महाराष्ट्र संघास रौप्यपदक पटकावले, सब ज्युनिअर मुली:
ढवाण श्रेया, रांजणे तनुजा
तारवारे इशिता,भट्ट निशा,बोरले आस्था,बाटे सायली,
प्रशिक्षक:- निलेश माळवे(परभणी)
सब ज्युनिअर मिश्रदुहेरीत गटात महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत दिल्ली संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली च्या मिश्रदुहेरी जोडी ला सुवर्ण पदक, तर महाराष्ट्र रौप्यपदक पटकावले मिश्र दुहेरी :-भोसले राजवीर व सूर्यवंशी प्रांजल.
ज्युनियर मुलांच्या गटात राजस्थान संघाने ज्युनिअर मुलांच्या गटात अंतिम फेरीत तामिळनाडू संघाचा( २-१)सेट मध्ये पराभव करत राजस्थान: सुवर्णपदक, तामिळनाडू: रौप्यपदक, तर गुजरात: कांस्यपदक पटकावले.
ज्युनिअर मुलीच्या गटात केरळ संघाने अंतिम फेरीत गुजरात संघाचा पराभव करून केरळ: सुवर्णपदक, गुजरात: रौप्यपदक, तर हिमाचल प्रदेश: कांस्यपदक पटकावले.
ज्युनिअर मुले व मुली गटात महाराष्ट्र संघाचे खेळाडू साखळी फेरीत बाद झाले. ज्युनिअर मुले:यादवअवनीश
दिपक परियार ,केशरखाने कृष्णा,मालधुरे अथर्व,
पोळ ओंकार, जेजुरकर हर्षल
मिश्र दुहेरी::गाडे हर्ष व धरणे तनिष्का ,संघ प्रशिक्षक : आशिष ओबेरॉय (मुंबई नवी)
ज्युनिअर मुली: निकम प्रिती
पलक साळुंखे ,तपस्वी पगारे, पाटील अंजली, कनिष्क गिरे
प्रशिक्षक: हेमंत पाटील (नाशिक). या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन चे अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार सचिव गणेश माळवे, शेख फिरोज , सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा