सिंधुदुर्ग १६ :राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणी कामगार गृहपात्रता निश्चिती करणासाठी सिंधुदुर्गातील, कुंभारमठ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मदत कक्षला गिरणी कामगारां च्या वारसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.मि.म.संघाच्या कार्यकर्त्यां सौ.रश्मी राजेंद्र लुडबे यांच्या विशेष सहकार्याने गेल्या दोन आठवड्या पासून हे मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.या मदत कक्षचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरदूरच्या गावांमधील कामगारांच्या वारसांनी चांगलाच लाभ घेतला.
रविवारी कुंभारमठ,तालुका मालवण येथे पार पडलेल्या गिरणी कामगार वारसांची सभा पार पडली.या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईच्या गिरण्यांमध्ये काम करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कामगार आज हयात नाहीत तर काही वृद्धापामूळे बाहेर पडू शकत नाहीत,ही गोष्ट लक्षात घेऊन,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोफत मदतकक्ष सुरू केल्या बद्दल गिरणी कामगार वारसांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच पात्रता तपासणीसाठी जवळपास ५०० वारसांची नोंदणी पूर्ण होईल,असे सौ.रश्मी राजेंद्र लुडबे यांनी सांगितले असून आतापर्यंत ३१७ गिरणी कामगार वारसांनी संपर्क साधला असून १०० वारसांची पडताळणी पूर्ण झाली आहे.म्हाडा अंतर्गत पात्रता निश्चिती करणासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे.•••
addComments
टिप्पणी पोस्ट करा