*इतिहासाच्या डोळसपणे अभ्यासातूनच वास्तवाची मांडणी शक्य* -डॉ.सोमनाथ रोडे


 नांदेड:(दि.३१ ऑक्टोबर २०२३) 

           इतिहासामध्ये एखाद्या घटनेबद्दल अभ्यासकांची अनेक मतमतांतरे दिसून येतात; परंतु पुराव्याच्या आधारे इतिहासाच्या डोळसपणे अभ्यासातूनच वास्तवाची मांडणी शक्य असल्याचे उद्गार इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ.सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले.

         श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते दि. ३० ऑक्टोबर रोजी बोलत होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या. यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संगीता शिंदे, डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री जी.भोपाळे, प्रा.एन.डी.आंबोरे, प्रा.शितल सावंत यांची उपस्थिती होती.

         पुढे बोलताना डॉ. साईनाथ रोडे म्हणाले की, इतिहास संशोधकांनी सत्याचा विपर्यास न करता वास्तववादी इतिहास मांडण्याकडेच त्याचा कल असला पाहिजे; कारण इतिहासकार हा समाजाला इतिहासातून दृष्टी देण्याचं काम करत असतो.

               यावेळी इतिहास अभ्यास मंडळ व नंदगिरी भित्तिपत्रक फलकाचे अनावरण करण्यात आले. यासोबतच सिंधू संस्कृती मधील उत्खनन स्थलांतर्गत सापडलेल्या विविध वस्तूंवर प्रकाश टाकणारे नंदगिरी व शिखर संमेलन जी:२० शिखर संमेलन २०२३ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.  

            अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे म्हणाल्या की, किल्ले व ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक दृष्टी मिळून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती वाढीस मदत होऊ शकते.

         प्रारंभी कु.पूजा वाटोरे हिने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु.माधवी सरवदे हिने केले. आभार डॉ.साईनाथ बिंदगे यांनी मानले.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर लष्करे, उपाध्यक्ष पूजा वाठोरे, सचिव माणिका देलमडे,सहसचिव ओंकार मेकाने, कोषाध्यक्ष राणी तिडके, सह- कोषाध्यक्ष वेदांत पवार व सदस्य तसेच नंदगिरी भित्तिपत्रकाचे संपादक अमोल काकडे, सहसंपादक अंजली भुक्‍तरे व इतर सदस्य यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज