आंतरराष्ट्रीय धोके निवारणाच्या दिवशी सायन्स महाविद्यालयात प्रतिज्ञेचे वाचन

 

नांदेड दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय धोके निवारणाच्या दिवशी सायन्स महाविद्यालयात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमात प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम प्रारंभ झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी असे म्हटले की संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला गेला आहे. 8 सप्टेंबर रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये व राज्य पातळीवर दिनांक 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याबाबत तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी रंगीत तालीम घेण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सर्वांनी प्रतिज्ञेचे वाचन करणे अनिवार्य आहे. आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासाठी सन 2023 यावर्षी ही प्रतिज्ञा तयार केली आहे. त्या प्रतिज्ञेचे वाचन आज आपण या ठिकाणी  करणार आहोत. तसेच आपण एकत्र या ठिकाणी सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी मिळून प्रतिज्ञा घेणार आहोत.

 यावर्षी ही प्रतिज्ञा तयार केली असून  शासन आपत्ती व्यवस्थापनाचे विविध उपक्रम कुटुंबामध्ये, समाजामध्ये, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी, आपत्ती पासून स्वतःची काळजी व सुरक्षा करण्याविषयीचे ज्ञान प्राप्त करणे तसेच आपत्तीचे धोके कमी करणाऱ्या समुदाया वर आधारित उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे व कुटुंबात समाजात देशात आपत्ती बद्दल जनजागृती करून आपत्तीचे निवारण करणे मग ती कोणत्याही प्रकारची आपत्ती असो जीवित, वित्त तसेच पर्यावरण विषयक असो त्याची हानी होऊ नये म्हणून सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे यासाठी ही प्रतिज्ञा आज आपण सर्वजण इथे घेत आहोत. कार्यक्रमात या प्रतिज्ञेचे वाचन करणे अनिवार्य आहे.अशी माहिती देण्यात आली. सर्व उपस्थित त्यांनी सभागृहामध्ये प्रतिज्ञाचे वाचन केले. विशेष उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ई. एम. खिल्लारे, प्रा रेनी राजेश्वर राव, प्रा धीरबसी एच ए, प्रा डूरके एम आर, प्रा अंबरखाने एन एस, स्मिता चालिकवार, तुकाराम बोईवाड, रंजन राठोड, खलील बेग, अमर सोनसळे, तुकाराम गजभारे यांसोबत इतर अन्य स्टॉप व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची कार्यक्रमात उपस्थिती होती.


टिप्पण्या