सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस.यांच्या अध्यक्षतेत यात्रा नियोजन बैठक संपन्न


      राम दातीर 

माहूर ( प्रतिनिधी ) येत्या पंधरा तारखेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेत दि.9 ऑक्टो. रोजी सायं.5 वा. तहसील कार्यालयाच्या सभागृहात यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवरात्र काळात यात्रेशी निगडित असलेल्या विभाग प्रमुखांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेऊन काही सूचना केल्या. यावेळी तहसीलदार किशोर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. शिनगारे, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. माचेवार व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांची व्यसपीठावर उपस्थिती होती.

    यात्रा काळात भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी,महाप्रसाद,सुखकर प्रवास सुविधा, शौचालय, मुतारी,स्वच्छता आदी सुविधा व सुरक्षा पुरविण्या संदर्भात त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक त्या सूचना केल्या.नवरात्र महोत्सव हे माहूरकरांचे वैभव असल्याने काही पत्रकारांनी निमंत्रण नसल्याची पर्वा न करता चर्चेत सहभाग घेऊन प्रत्येकवेळी गंभीर बाब अशी की, म्हणून अनेक सूचना केल्या. त्याला सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला हे विशेष.आढावा बैठकीस विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, स. पो. नि. संजय पवार,शाखा अभियंता आकाश राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे शिवाजी साळुंके, नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, परिवहन महामंडळाचे चंद्रशेखर समर्थवाड यांचेसह कार्यलयीन प्रमुखांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी 

येत्या 12 किंवा 13 तारखेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे सह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने सर्व विभाग प्रमुखांनी हजर राहण्याची सूचना केली.नायबतहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी आभार मानले.

टिप्पण्या