नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीपासून मोफत प्रवास मिळणार

 

नवी मुंबईतील रहिवासी पैशाने जरी गरीब असले,  तरी मनाने खूप श्रीमंत आहेत. त्यांना पुढील २०  वर्ष जागा व पाण्याचे  जादा कर आकारले जाणार नाहीत. नवी मुंबई शहराच्या विकासात ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे फक्त नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना या दिवाळीपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसचा प्रवास मोफत मिळणार आहे. असे स्पष्ट उद्गार नवी मुंबईचे शिल्पकार, माजी मंत्री,  लोकनेते आमदार  गणेश नाईक यांनी जाहीर सभेत काढले.

भाऊ भापकर मित्र मंडळाच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२३ रोजी  सानपाडा येथे  समाजसेवक भाऊ भापकर यांच्या वाढदिवसानिमित्त कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी समाजसेवक व सानपाडा भूषण भाऊ भापकर यांचा  वाढदिवसानिमित्त  आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर  सत्कार करण्यात आला. भाऊ भापकर यांना शुभेच्छा देताना गणेश  नाईक यांनी सांगितले की,  गोर गरिबांना मदत करणारे,  सर्वांच्या  सुखदुःखात सहभागी होणारे, आपल्या मायभूमीची नाळ जोडणारे असे सर्व समावेशक असणारे भाऊ भापकर यांना चांगले भविष्य आहे.  त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो, याच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. नवी मुंबईचे माजी महापौर व माजी खासदार संजीव नाईक यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, सर्वांशी स्नेह आणि जनतेशी आपुलकीचे संबंध जोडणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सहकारी भाजपा नवी मुंबई पंचायत राज ग्रामविकास मोर्चा संयोजक भाऊ भापकर आहेत.. त्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

याप्रसंगी सभागृह नेते रवींद्र इथापे, कुलस्वामिनी पतसंस्थेचे संचालक शंकरराव पिंगळे,  भाजपाचे नेते सतीश निकम, मराठी उद्योजक मंगेश आमले, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सानपाडा गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील आदी मान्यवरांनी भाऊ भापकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उद्योजक किसन उंडे, राजू वराळ, दत्ता पाटील, गणेश कमळे, समाजसेविका शैलजा पाटील, भीमाशंकर सोसायटीचे चेअरमन रमेश पवार,  सेक्रेटरी संजय चव्हाण, सानपाडा  ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष 

 मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  खजिनदार विष्णुदास मुखेकर, सुभाष बारवाल, मराठा विकास प्रतिष्ठानचे  ज्ञानेश्वर जाधव,  सानपाडा गार्डन ग्रुपचे सदाशिव तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईतील अनेक सामाजिक व सहकारी संस्थांच्या वतीने भाऊ  भापकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. थापलिंग महिला मंडळ व सानपाडा येथील महिला मंडळाच्या वतीने भाऊ भापकर यांचा सत्कार करण्यात आला. भाऊ भापकर यांनी  मान्यवर व सर्व उपस्थितांचे जाहीर आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू सैद ,अशोक कवडे,  रामदास आतकरी,  गणेश हुले इत्यादी कार्यकर्त्यांनी  विशेष घेतले.

आपला 

मारुती  विश्वासराव

टिप्पण्या