नांदेड: झरी येथील सचिन माधवराव गिरे- पाटील झरीकरांना इंदौर येथील मालवांचल विद्यापीठाच्या वतीने समाजशास्त्र विषयात विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
इंदौर येथील मालवांचल विद्यापीठाच्या संशोधन मार्गदर्शक डॉ. सोनाली पंडित यांचे मार्गदर्शनाखाली सचिन गिरे-पाटील झरीकर यांनी 'द सोशॉलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ मास मिडियाज इन्फ्ल्यून्स ऑन रूरल डेव्हलपमेंट: ए स्पेशल रेफरन्स टू नांदेड' या विषयावर इंदौर येथील मालवांचल विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला. दरम्यान, इंदौर: मालवांचल विद्यापीठाच्या वतीने प्रा. सचिन गिरे पाटील झरीकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. सचिन गिरे पाटील यांनी पीएच. डी. पदवी संपादित केल्याबद्दल सचिन पाटील - झरीकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे सर्वत्र सहर्ष स्वागत करण्यात येत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा