चंद्रकांत कुलकर्णी-प्रशांत दळवी

यांची आज प्रकट मुलाखत

नांदेड ः
नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी आणि नाट्य लेखक प्रशांत दळवी या सुप्रसिद्ध दुकलीला एकत्रपणे ऐकण्याची संधी नाट्यप्रेमी रसिकांना शुक्रवारी सायंकाळी मिळणार आहे. नांदेडमधील डॉक्टर-लेखक डॉ.नंदू मुलमुले हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामागचं निमित्त आहे, डॉक्टरांचे वडील, संस्कृत पंडित मंगलमुर्ती महादेव मुलमुले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं. अभंग पुस्तकालय आणि मनदर्पण हॉस्पिटल यांच्या सहयोगाने डॉ.मुलमुले यांनी आपल्या वडलांच्या स्मरणार्थ नाट्य व संगीतप्रेमींसाठी दोन वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले आहेत. कुलकर्णी आणि दळवी यांची प्रकट मुलाखत कुसुम सभागृहात सायंकाळी ६ वाजता होईल.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी डॉ.मृदुला दाढे यांचे हिंदी चित्रपटांचे लोकोत्तर संगीतकार ह्या विषयावर भाषण होईल. हे दोन्ही कार्यक्रम रसिक-श्रोत्यांसाठी निःशुल्क असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजीव कुळकर्णी, डॉ.मोहित सोलापूरकर, डॉ.रामेश्वर बोले आणि मुलमुले परिवाराने केले आहे.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी वेगवेगळे कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने अनेकदा नांदेडला येऊन गेले आहेत. पण ते प्रशांत दळवींसह प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच येत आहेत. त्यांच्या जिगिषा नाट्यसंस्थेच्या स्थापनेला ४० वर्षे लोटली आहेत. अलीकडे त्यांचा ‘मन सुद्ध तुझ’ या गाजलेल्या मालिकेच्या निमित्ताने मुलमुले यांच्याशी घनिष्ट संबंध आला.
टिप्पण्या