राष्ट्रपती डॉ .ए .पी .जे .अब्दुल कलाम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते* .. *प्रा . अनिल पाटील*

 

( किनवट )जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर ए .पी .जे .अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व होते ते भारतासाठी नव्हे तर जगासाठी आदर्श एक सच्चे देशभक्त होते असे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा . अनिल पाटील  आपले विचार व्यक्त केले .
सर्वप्रथम त्यांच्या जन्मदिनानिमित्त डॉ. ए.पी .जे .अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
 याप्रसंगी कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा . पुरुषोत्तम येरडलावार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या राष्ट्रपती डॉ .ए.पी .जे . अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना पुढे प्रा . अनिल पाटील म्हणाले की ,नाग पृथ्वी अग्नी आकाश अशी अनेक क्षेपणास्त्रे बनवली म्हणून त्यांचा नावाचा मिसाईल मॅन म्हणून उल्लेख केला जातो असे ते म्हणाले.
अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर अशा या थोर महापुरुषाची आठवण राहावी म्हणून त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाते त्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज महाविद्यालय परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यादृष्टीने महाविद्यालयातील विद्यार्थी यांना वेगवेगळे पुस्तक देऊन त्यांच्याकडून वाचन करून घेण्यात आले .
*याप्रसंगी प्रा .पुरुषोत्तम येरडलावार यांनी  "वाचन प्रेरणा दिनाचे "महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले* .
 या कार्यक्रमाला मुक्त विद्यापीठाचे प्रा . शिवदास बोकडे डॉ . गजानन वानखेडे डॉ .योगेश सोमवंशी कार्यक्रमाधिकारी प्रा . शेषराव माने प्रा . अजय पाटील प्रा . प्रल्हाद जाधव  विद्यार्थिनी अजंली भांगे , माहेश्वरी आमले , प्रतीक्षा राठोड , वर्षा भुरके , शारदा राठोड ,निकिता शेलार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविले .
टिप्पण्या