सानपाडा येथील रहिवाशांच्या आवाजाने उपायुक्त सिताराम मास्तर उद्यानात हजर*


नवी मुंबईतील सानपाडा येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व रहिवाशांनी सिताराम मास्तर उद्यानातील गैरसोयीबद्दल गेली दीड वर्ष लेखी तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर सानपाडा सिताराम मास्तर उद्यानातील ७.५० च्या गार्डन ग्रुपने आवाज उठवून नवीन मुंबई महानगरपालिका उद्यानातील खेळाचे व व्यायामाचे साहित्य दुरुस्त करीत नसतील तर आपण लोकवर्गणीतून हे काम करू असे जाहीर केल्यानंतर अनेक रहिवाशांनी वर्गणी देण्यास सुरुवात केली व जवळजवळ २० हजार रुपये वर्गणी जमा झाली. आज सिताराम मास्तर उद्यानातील रहिवाशांच्या गैरसोयीबद्दल लेखी तक्रार अर्ज नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त यांना भेटून देण्याचे ठरले होते. परंतु सानपाडा येथील रहिवाशांचा आवाज नवीन मुंबई महानगर पर्यंत पोहोचला आणि स्वतः नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. दिलीप नेहरकर हे स्वतः सिताराम मास्तर उद्यानात हजर झाले. याप्रसंगी सानपाडा गार्डन ग्रुपच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्याराव, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, विभाग्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे, यांनी गार्डन ग्रुप सदस्यांच्या उपस्थितीत लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. दिलीप नेहरकर यांना दिले. याप्रसंगी पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील, अशोक संकपाळ, विकास वाघुले, नरेश देशमुख, शंकर चिकने, विलास देशमुख, परशुराम शिरवळ, श्यामराव मोरे, भरत खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनात सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रातील सदस्यांचेही योगदान आहे.

उपआयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार गेली दीड वर्ष सिताराम मास्तर उद्यान सेक्टर ७ मधील सर्व खेळणी व व्यायामाचे साहित्य, विद्युत साहित्य दुरुस्ती, कचऱ्याचे डबे खराब झालेले आहेत. त्याविषयी नवीन मुंबई महानगरपालिकेकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वारंवार लेखी तक्रार करून देखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. सानपाडा नागरिक प्रकृती संदर्भात जागरूक असल्याने सकाळच्या वेळी बहुसंख्येने नागरिक उद्यानात जिम व योगा करण्यासाठी येत असतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेला कर भरून देखील मूलभूत सुविधांचा अभाव आहे.नाविलाजस्तव आम्ही सानपाडा नागरिक एकत्र येऊन लोक वर्गणीतून हे काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी उत्स्फूर्त लोकसहभाग वाढत आहे. मात्र याची गंभीर दखल नवी मुंबई महानगर महानगरपालिकेने घेतली आहे. सिताराम मास्तर उद्यानातील व्यायाम साहित्य दुरुस्तीचे व नवीन खेळणी साहित्य १५ दिवसात देण्याचे उपायुक्त श्री. दिलीप नेहरकर यांनी मान्य केले आहे. त्याबद्दल सानपाडा रहिवाशांच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या