कंधार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 




प्रतिनिधी, कंधार
------------------
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान ‘आमचा गाव, आमचा विकास’ पंचायत समिती, कंधार जि.नांदेडच्या वतीने १५ वा वित्त आयोग अंतर्गत वार्षिक कृती आराखडा सन २०२४- २५ साठी शुक्रवारी, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कै.वसंतराव नाईक सभागृहामध्ये एकदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक व विभाग प्रमुखांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी महेश पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती पंजाबराव वडजे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अॅड.मारोती पंढरे, शिरुरचे सरपंच सुधाकर जाधव, सरपंच गित्ते मामा, यशदाचे प्रशिक्षक जे.पी.मुंडकर, आयनवाड, विष्णू गोडबोले, पी.के.वाडीकर, विस्तार अधिकारी कैलास रेणेवाड, सुनंदा गादेकर आदींची उपस्थिती होती. 
     या कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता, पाणीपुरवठा, गाव अंतर्गत विविध विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करून, विविध योजनांचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सरपंच, ग्रामसेवक, विभाग प्रमुखांना केल्या. 
     यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास नारनाळीकर, सचिव जगदीश शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, माजी सचिव डॉ.व्ही.जी.आदमपुरकर, माजी कोषाध्यक्ष श्रीधर विश्वासराव, महिला उपाध्यक्षा स्नेहलता जाधव, चिखलीचे सरपंच साहेबराव पोटफोडे, शिवाजी पानपट्टे, प्रकाश मुसळे, विलास कल्हाळे, सुदर्शन कपाळे, माधव शिंदे, स्वप्निल सोनकांबळे, राम बारुळकर, संचालक रमाकांत जोगदंड, लाडकाचे सरपंच तानाजी शिंदे, सावळेश्वरचे सरपंच केशव कदम आदी उपस्थित होते. 
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के यांनी केले. तर आभार शिवगिर गिरी यांनी मानले. यावेळी विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या