पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप*


 सातारा - कल्याणच्या पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने महाबळेश्वर पासून जवळपास १५कि.मी. अंतरावरील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा, आढाळ, ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता १ली ते ५वी च्या एकूण २६ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप नुकतेच करण्यात आले. ह्या शालेय सामुग्रीत अर्धा डझन २००पानी वह्या, टिफीन बॉक्स, वाटर बॉटल, पेन -पेन्सिल प्रत्येक विद्यार्थ्याला न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, न्यासाचे सचिव अनिल मेश्राम, माजी सचिव आयु मधुसूदन राऊत, माजी अध्यक्ष भिमराव लोणारे, सदस्य मुरलीधर ढवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या वाचनालयासाठी दोन लोखंडी रॅक्स सुध्दा दान करण्यात आल्या. 



कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्ती जाधव यांनी न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव अनिल मेश्राम, मधुसूदन राऊत, भिमराव लोणारे व मुरलीधर ढवळे यांचे पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी सचिव अनिल मेश्राम यांनी पारमिता धर्मादाय न्याय गेल्या १२वर्षांपासून राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती उपस्थितांना करून दिली. अध्यक्ष बालकदास मेश्राम यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय साहित्याच्या वाटपाचे वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती जाधव, उपशिक्षक सौ. कविता जाधव, सौ. सुहासिनी ढेबे - अंगणवाडी सेविका, सौ.कमल घाडगे - अंगणवाडी मदतनीस, संजिवनी ढेबे - उपसरपंच, उमेश ढेबे - शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि विठ्ठल ढेबे, कोंडीबा ढेबे, रामचंद्र ढेबे, जनार्दन ढेबे - इत्यादि पालक उपस्थित होते.

शालेय साहित्याचे मोफत वाटप केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्ती जाधव यांनी पारमिता धर्मादाय न्यासाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपला.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज