मुंबई दि.१७: आज चंद्रावर यान उतरविण्यात किंवा सूर्य प्रदक्षिणेत भारत यश संपादन करीत असले तरी याचे प्रेरणास्रोत भूतपूर्व राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम आहेत.त्यांना मिसाईल मॅन म्हटले जायचे,विज्ञानाच्या दिशेने त्यांनी भारताला उंच शिखरावर नेले,हे कदापि विसरता येणार नाही,असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे वाचन प्रेरणा दिन सोहळ्यात मांडले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने सोमवारी लायब्ररी मध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.त्यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते वाचक आणि संचालकांपुढे बोलत होते.
दरवर्षी वाचन प्रेरणा दीन भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी संपन्न होतो.त्यावेळी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले.सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे,साहित्यिक काशिनाथ माटल, नाट्य कर्मी के.राघवकुमार,आशा आसबे,यांची राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे तेजःपुंज जीवनकार्य उलगडणारी भाषणे झाली.ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले.ग़.द.आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचा विद्यार्थी ऋतिक माने यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावरी ल पुस्तकातील परिच्छेद वाचून "वाचन प्रेरणा "दिनाची सांगता केली.सर्वश्री सुनिल बोरकर,कॉलेजचे प्राचार्य केतन सारंग,मारुती शिंत्रे, विलास डांगे,मधू घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा