नांदेड- नानक साई फाऊंडेशनची नववी संत नामदेव सद्भभावना घुमान यात्रा नोव्हेंबरमध्ये पंजाब पंजाब दौऱ्यावर जाणार आहे.
नानक साई फाऊंडेशन (महाराष्ट्र) तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरु नानक देव महाराज यांच्या ५५४ व्या प्रकाशपर्व व संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त नवव्या भगत नामदेव घुमान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत ही यात्रा दिल्ली-चंदीगड-हरियाणा-हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहे.
नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे सांगितले कि ,या सद्भावना यात्रेत महाराष्ट्र राज्यातून १७ जिल्ह्यातील २९८ भाविक सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील बंधु प्रेमाचे संबंध अधिकदृढ करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. दोन राज्यात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध जोडणे आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना करणे यासाठी नानक साई फाऊंडेशन महत्वाची भूमिका निभावत आहे.
गुरुद्वारा लंगर साहिब चे मौजुदा मुखी संत बाबा नरिंदरसिंघ जी,संत बाबा बलविंदरसिंघ जी, कार सेवा मुखी अमृतसर संत बाबा कश्मीरसिंघ जी भुरीवाले,संत बाबा गुरुदेवसिंघ जी आनंदपुरसाहिबवाले, संत बाबा सतनामसिंघ जी पिपलीसाहिबवाले, संत बाबा जोगासिंघजी करनालवाले यांनी यात्रेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. शिरोमणी संत भक्त नामदेव सद्भावना यात्रेचे प्रमुख संयोजक तथा नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,मुख्य संरक्षक सरदार रुपिंदरसिंग शामपुरा, सरदार सुरेंद्रसिंग सोडी, जॉइंट जनरल सेक्रेटरी भाई श्रेयसकुमार बोकारे पाटील, दिलीप अंगुलवार, बाबा रणजीतसिंग, सरदार राजिंदरसिंग जीत, सरदार बलजिंदरसिंग पनेसर, सरदार सुखविंदरसिंघ गरचा,सरदार जोरासिंग मोघा, सरदार हरपालसिंगमिंटू, सरदार गुरुसेवकसिंग मेडिकलवाले, सरदार कुलदीपसिंग दीपा आणि सरदार बलविंदर सिंग,मास्टर जोगेंदरसिंघ अचलीगेट हे उपस्थित होते.
"दृढ बंधुत्वाचे लक्षण"
नानक साई फाउंडेशनच्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेला नांदेड येथून 24 नोव्हेंबर 2023 रोजी “सशक्त बंधुत्व” या थीमसह प्रारंभ होणार आहे. 25 नोव्हेंबर (दिल्ली - पानिपत - कर्नाल), 26 नोव्हेंबर(कुरुक्षेत्र), 27 नोव्हेंबर (चंदीगड), 28 आणि 29 नोव्हेंबर (आनंदपूर साहिब - नैना देवी - भाकडनंगल धरण- खटखटकला), 30 नोव्हेंबर (श्री क्षेत्र घुमान - अचल धाम - बटाला) ), 1 आणि 2 डिसेंबर (अमृतसरसाहिब) आणि 3 डिसेंबर रोजी हमसफर एक्स्प्रेस (12752) ने अमृतसरहून लुधियानाला जाईल आणि हजूर साहिबला (नांदेड) परत येईल. स्थानिक संस्था आणि साद संगत या मार्गावर यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्याचे नियोजन करत आहेत.. आम्हाला तुमचे सहकार्य नक्कीच हवे आहे.. कृपया सहकार्य करावे असे आवाहन नानक साई च्या वतीने करण्यात आले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा