राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )महाराष्ट्राच्या साडेतिन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात आज दि.15 ऑक्टो.रोजी स.१० वा.चे सुमारास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकेच्या गाभाऱ्यात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश नाव्हकर,सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचे हस्ते घटस्थापना पार पडली. यावेळी उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शिनगारे, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी, आशिष जोशी, अरविंद देव यांची उपस्थिती होती. पुजा विधीचे पौरोहित्य वेशासं रवींद्र काण्णव,पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले.
घट स्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्याने अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नाव्हकर, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.व उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शिनगारे यांनी सपत्नीक कुमारीका पूजन केले.घटस्थापनेप्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षीततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोख पणे पार पडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर,बळी राजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर त्या॑चे भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी साकडे घातले.छबीना काढून परिसर देवता पूजन झाले.महाआरती नंतर मातेला नैवद्य अर्पण करण्यात आला.त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली, त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा