नांदेड दि. 19 (प्रतिनिधी)
दयानंद नगर येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदार साहेबसिंग चंदेल व सौ कल्पनाताई चंदेल ठाकुर यांची कन्या डॉ रोशनी चंदेल यांनी वैद्यकीय पदवी परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची गुणवत्तेवर आधारीत बालरोग तज्ञ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे आतेष्ठ , नातेवाईक व मित्र परिवारासह सर्व स्तरातून कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साहेब सिंग व कल्पनाताई चंदेल या दाम्पत्यांना पुत्रलाभ झाला नाही परंतू संस्कारक्षम अशा परिवारात जन्मलेल्या दोन्ही ही मुलींपैकी धाकटी मुलगी डॉ रोहीनी हि दंतरोग तज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत आहे तर थोरली डॉ रोशनी ही बालरोग तज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. या दोन्हीही मुलींना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य करण्यासाठी पालकांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद असून गरजु व पिडीत रुग्णांची सेवा आपल्या मुलींच्या माध्यमातून घडावी या हेतूने पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम व दिलेले प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी असे आहे.
डॉ रोशनी यांच्या यशाचे चंद्रपालसिंह ठाकुर, डॉ शिवचरणसिंह बैस , ईंजि गणेशसिंह चंदेल, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ छायाताई बैस-चंदेल,रघुसिंह बैस, देवेंद्रसिंह विराट, डॉ गोविंदसिंह ठाकुर, राजसिंह चंदेल, तुषारसिंह बैस व प्रदीप सोनटक्के इत्यादींनी अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा