लातूर :
दिव्यांग नागरिकांच्या उन्नती व बौद्धीक विकासासाठी कार्यरत असलेल्या स्पेशल ऑलिम्पीक्स भारत सेवाभावी संघटनेच्या लातूर जिल्हा समितीवर प्रसिद्ध उद्योजक श्री अजय गोजमगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पेशल ऑलिम्पीक्स भारत सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया व विभाग संचालक डॉ. भगवान तलवारे यांनी ही नियुक्ती केली आहे. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत ही लोकांची जागतिक चळवळ आहे. जिथे क्षमता किंवा दिव्यांगत्वची पर्वा न करता प्रत्येक व्यक्तीला स्वीकारले जाते. सर्व भेदभाव संपवण्यासाठी खेळ, आरोग्य, शिक्षण आणि नेतृत्व घड़वून ही चळवळ बौद्धिकदृष्ट्या अक्षम लोकांना सक्षम करून जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळावे, यासाठी संस्था प्रचार व प्रसारार्थ कार्यरत आहे.
या निवडीबद्दल श्री अजय गोजमगुंडे यांचे उदय गोजमगुंडे, नीलेश ठक्कर, भारतमामा माळवदकर, धनंजय बेम्बड़े, चंद्रकांत झेरिकुंठे, विजयकुमार स्वामी, तुकाराम पाटील, राजेश मित्तल, अनिरूध्द कुर्डुकर, जयप्रकाश दगड़े, अशोक पांचाळ, सुनिल लोहिया, सुधाकर जोशी, धर्मवीर भारती, नागनाथ गित्ते, चंदूलाल बलदवा यांनी अभिनंदन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा