माहूर ( प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे दि.3 सप्टें.2023 रोजी स.11-30 च्या सुमारास ग्रामपंचायतच्या वतीने नालीचे बांधकाम सुरु होते.तिथे साफसफाई करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने निर्मानाधीन भिंत संजय किशन मडावी (वय ५० वर्षे), शुभम भीमराव पेंदोर (25 वर्षे )व सुमित सिताराम मरापे (18 वर्षे )रा. कोलामखेडा यांच्या अंगावर कोसळली.त्यात संजय मडावी ठार झाला.
भिंत अंगावर कोसळलेल्या तिघांनाही माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि.एन. भोसले व डॉ. मरापे यांनी जखमींची पाहणी करून संजय मडावी यास मृत घोषित केले. तर सुमित व शुभम पेंदोर या दोघावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात स्थलांतरित केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा