खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने दोन रुग्णांच्या उपचारासाठी सहा लाखाचा निधी मंजूर

 हिमायतनगर, दि.१९ (प्रतिनिधी) 


हिमायतनगर शहरातील एका महिलेस व तालुक्यातील सरसम (बु.) येथील व्यक्तीस दूर्धर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधत आरोग्य सेवेसाठी मदत मागीतली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी दोन्ही रुग्णांवर योग्यवेळी योग्य उपचार व्हावेत यासाठी पंतप्रधान कार्यालयात लेखी पत्र दिल्याने सदरील रूग्णास प्रत्येकी ३ लाख रुपये अशी एकुण सहा लाख रुपयाची आरोग्य उपचारासाठी

 आर्थिक मदत मंजुर झाली आहे.शहरातील नसीम बी जुम्मा खान पठाण महिलेस, व सरसम बु. येथिल तुकाराम सुर्यवंशी यांना दूर्धर आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. सुरुवातीस नातेवाईकांनी त्यांच्या उपचारासाठी कर्ज काढुन उपचार केले. परंतु दिवसें दिवस या आजारावर होणारा खर्च वाढतच जात होता. अशा कर्जबाजारी झालेल्या कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. घरची हलाखीची परस्थिती पाहुन खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला. सदरील व्यक्तींच्या उपचारासाठी शक्य तेवढी मदत दिली जावी अशी पत्राद्वारे मागणी केली. 

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने उपरोक्त दोघांच्याही उपचारा करीता प्रत्येकी ३ लाख अशी ६ लाख रुपये इतकी रक्कम मंजुर केली आहे. 

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज