लाल कंधारी पशुसंवर्धन व संशोधन केंद्राच्या स्थलांतराला स्थगिती :

 

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा महसूल मंत्र्याकडे यशस्वी पाठपुरावा
नांदेड : कंधार तालुक्यातील गऊळ येथील लाल कंधारी पशुसंवर्धन आणि संशोधन केंद्र आंबेजोगाई येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होता मात्र हे केंद्र स्थलांतरित करू नये यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर या पाठपुराव्याला यश आले असून महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे तसे निर्देशही सहाय्यक संचालक पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले आहेत. 
नांदेड जिल्ह्यातील . गेल्या अनेक वर्षापासून कंधार तालुक्यातील गऊळ येथे असलेल्या लाल कंधारी संशोधन केंद्राचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे स्थलांतरित होण्याच्या हालचालींना गती प्राप्त झाल्याची माहिती मिळाली खा. चिखलीकर यांना मिळाली होती . असे झाल्यास कंधार तालुक्यातील लाल कांधरीचे सवंर्धन आणि संशोधन कालबाह्य होईल. परिणामी लाल कंधारी ही अत्यंत सन्मानाची म्हणून ओळखल्या जाणारी पशुची प्रजातच धोक्यात येईल. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने स्थलांतराचा घेण्यात येणाऱ्या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी. कंधार तालुक्यातच या संशोधन केंद्राला अधिक बळकटी देऊन त्याचा विस्तार करावा . लाल कंधारीची प्रजात वाढली पाहिजे यासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हावेत अशी मागणी ही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली होती. या मागणीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशु संवर्धन सहाय्यक संचालक यांना निर्देश देऊन स्थगिती देत असल्याचे सुचना दिल्या आहेत . त्यामुळे खा. चिखलीकर यांच्या आणखी एका प्रयत्नांना यश आले आहे.

टिप्पण्या