-स्नेह मेळावा, कॉ.नागापूरकर पुरस्कार अटकोरे, व्यवहारे यांना जाहीर
नांदेड/ प्रतिनिधी
नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ, नांदेड संलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा २४ वा वर्धापन दिन आणि भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. कॉ.अनंतराव नागापूरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार माधव अटकोरे व नागापूरकर राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता पुरसकार सुनील व्यवहारे यांना जाहीर झाला आहे.
शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानातील वृत्तपत्र वितरण सेंटर येथे १५ रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या पत्रकारिता व वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार,ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार व वृत्तपत्र विक्रेता स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे तर पुरस्कार वितरण आ.बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे माजी आमदार अमर राजूरकर, प्रमुख अतिथी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय कार्यवाह शंतनू डोईफोडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारख अहमद, कॉ.प्रदीप नागापूरकर, उद्योजक गजानन काळे, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत घाटोळ यांची राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते माधव अटकोरे यांना कॉ.अनंतराव नागापूरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार तर कॉ.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हदगावचे सुनील व्यवहारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शंतनू डोईफोडे, विजय जोशी, प्रल्हाद उमाटे, अमोल अंबेकर यांचा विशेष सत्कार होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बाबु जल्देवार ,गणेश वडगांवकर, सत्यनारायण देवरकोंडा, अवधूत साबळे, शामसिंह चंदेल, बालाजी चंदेल, सरदारसिंह चौहान, चेतन चौधरी, संदीप कटकमवार, व्यंकटेश आनलदास, सतीश कदम, बालाजी सुताडे, सुनील व्यवहारे, अनंत संगेवार,हबीब उबेद, देवबा डोरले, बाबुराव बडुरे, भागवत गायकवाड, गजानन पवार, विनायक आंधे, अनुप ठाकूर, लखन नरवाडे, खय्यूम पठाण, अवधूत पसलवाड, रामेश्वर पवार, शंकर हुस्से, गणेश जुजाराव यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा