मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडट व सेवाभावी कार्यकर्ते उमाकांत थळकर हे मुंबई पोर्टमधून ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्या प्रित्यर्थ त्यांनी आपले परिवार ८३ चे विशेष सहकारी मित्र व नातेवाईक यांना २५ व २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पनवेल गोवा रोडवरील जशन फार्म् या सुंदर रिसॉर्टवर स्नेहभोजन दिले. उमाकांत थळकर यांचा परिवार ,८३ व नातेवाईकांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
उमाकांत थळकर हे स्वभावाने शांत व मृदुभाषी आहेत. वेळेवर कामावर येणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे. हे त्यांचे खास वैशिष्ट्य . ते कबडीपट्टू असून सर्वांना सहकार्य करतात. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, उमाकांत थळकर यांनी मुंबई पोर्टमध्ये ४० वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून ते निष्कलंकपणे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा स्वभाव शांत असून ते सर्वांना सहकार्य करतात. विश्वासराव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुंबई पोर्टमध्ये आत्ता फक्त ३ हजार कामगार शिल्लक राहिले असून मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार काम करीत आहेत या महिन्यात पोर्टच्या कामगारांना व सेवानिवृत्तांना ५ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. ऑक्टोबर २६ च्या इशारा संपामुळे १७ ऑक्टोबरला बोनसचा करार झाला असून ६ नोव्हेंबरला पगारवाढीबाबत दिल्लीत द्वीपपक्षीय वेतन समितीची मिटिंग होणार आहे .गोदी कामगारांना लवकरच चांगली पगारवाढ मिळेल अशी आशा आहे.
याप्रसंगी शेखर बर्वे, प्रकाश परब, शिवाजी सावंत, प्रदीप नलावडे, प्रदीप कांबळे , नामदेव घोडके , सौ. नूतन गरूड, सौ शालिनी खरात, सौ. आशा साळुंखे पाटील, आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन जोगेंद्र मुजावर यांनी केले. कार्यक्रमाला परिवार ८३ चे सहकारी कुटुंबासहित व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धी प्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा