पोदार इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथे शालेय क्रीडा स्पर्धे अंतर्गत लातूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.ही स्पर्धा 14,17 व 19 या वयोटातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या प्राचर्या डॉ.मालिनी सेन व उपप्राचार्य मा.श्री. अजय फरांदे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे प्रशिक्षक मा.श्री. प्रकाश होनवडनकर , जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव मा.श्री.दिनकर हंबर्डे तसेच सुचिता हंबर्डे,चैतन्य गोरवे, गगनदीप सिंघ,श्री.भोरे,सौ.साठे,आदी मान्यवरही उपस्थित होते. या स्पर्धेसाठी नीलकंठ,श्रावण,ओमेश पांचाळ, सोपान कुट्टे हे पंच म्हणून लाभले होते. या सर्व मान्यवरांचे शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन व उपप्राचार्य मा.श्री.अजय फरांदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन म्हणाल्या की, खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते, 21 व्या शतकात तरुण पिढी अनेक व्यासनाच्या आहारी जाताना दिसत आहे,शारीरिक मेहनतीचा आभाव यामुळे आजच्या तरुणांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.परंतु खेळांमुळे विद्यार्थ्याचा शारीरिक,मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास वेगाने घडून येण्यास मदत होते . स्पर्धेचे नियोजन पोदार स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री नितिन कंधारकर, फुरकान बायजिद, रत्नमाला मुंगळे यांनी करून स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले.
यावेळी शाळेचे व्यस्थापक श्री हरिदास रेड्डी, गोविंदसाई मकवाना,कार्यक्रम समन्वयक गुरुदीपसिंग, उच्च माध्यमिक समन्वयक जगन्नाथ ढेरे,माध्यमिक समन्वयिका रीना नायर, प्राथमिक समन्वयिका मिनाक्षी अय्यर उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा