कृषी सहाय्यक संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख

 


प्रतिनिधी, कंधार
---------------------
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख, तर सचिवपदी सतिष गोगदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
     सोमवारी, ९ आॅक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कंधार येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा होऊन तालुका शाखेतील रिक्त पदांवर नवीन पदाधिकार्‍यांची नवनियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी याच तालुक्यात कृषी सहाय्यक पदावर प्रदिर्घकाळ काम केलेले, सर्वांच्या अडचणी समजून घेऊन योग्य तो मार्ग काढणारे, अनुभवी सुनिल देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी सतिष गोगदरे, उपाध्यक्षपदी बालाजी डफडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या महिला जिल्हा प्रतिनिधी सौ.कल्पना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव वडजे, तालुका कार्याध्यक्ष शिवाभाऊ होनराव, वसंतराव मिटके, संजय गुट्टे, मधुकर राठोड, गोविंद यलपुरवाड, पल्लवी कचरे, सतिष वाघमारे, भुषण पेठकर, नामदेव कुंभारे, ईंगेवाड व तालुक्यातील सर्वच कृषी सहाय्यक कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते. 
     नवनियुक्त सर्व पदाधिकार्‍यांचे कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते व उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर मोरे यांनी केले. तर आभार गोविंद तोटेवाड यांनी मानले.
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज