रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने पायल ला मदत करण्यासाठी आवाहन

 


आज दिनांक 5-10-2023 कोकातांडा ता.हिमायनगर जि. नांदेड येथील कु. पायल कैलास चव्हाण या अनाथ मुलींस तिच्या घरी जाऊन रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने पायल ला मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहन दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकूण रक्कम 26254 रुपये कु. पायल कैलास चव्हाण या अनाथ मुलींस फोन पे नंबर वर घरी जाऊन दिली. यावेळी कोकातांडा येथील कार्यकर्ते श्री. प्रकाशराव जाधव, श्री. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष राव जाधव, यांच्या श्री नारायणराव राठोड, कुमारी राणी जाधव, कुमारी प्रियतमा राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोका तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक श्री राजेश धरमुरे सर जवळगावकर, श्री संतोष चव्हाण सर कनकवाडीकर, तांडा येथील माता भगिनी नागरिक उपस्थित होते.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या आव्हानास श्रीमान प्रवीण दीक्षित साहेब DGP सेवानिवृत्त न्यायाधीश मुंबई यांनी पुढील साडेतीन वर्षाची लागणारी कॉलेजची व हॉस्टेलची संपूर्ण फीस भरण्याचे वचन दिले आहे. ही माहिती डॉक्टर श्रीमान दतराम राठोड साहेब उपमहासंचालक मुंबई यांनी दिली. तसेच पोहरा देवी येथील महंत श्री केशव महाराज यांनी सुद्धा पायालला मदत करण्याचे वचन दिले, मुर्तीजापुर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री. हरीश भाऊ पिंपळे साहेब यांनी पाच हजार एक रुपये मदत पायलला केली आहे.

सर्व दानशूर दात्यांचे रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव संस्थापक अध्यक्ष श्री सटवाजी पवार सर जवळगावकर आपले मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.खूप खूप धन्यवाद धन्यवाद असेच सहकार्य भविष्यात सुद्धा असू द्यावे सामाजिक कार्यासाठीही मदत दिलेली बघून पायलची आई, बहीण,भाऊ, मामा,मामी, आजी, आजोबा, या कुटुंबाला आनंद अश्रू आवरता आले नाही. पायल ची आई ढसाढसा रडत होती. रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव हे माझ्यासाठी देवदूत बनवून आले अशी भावना त्या आईने आजी-आजोबांनी मामा-मामींनी पायल ने भावना व्यक्त केली. 

कुमारी पायल कैलास चव्हाण तिची परिस्थिती कोका तांडा येथील शिक्षक श्री राजेश धरमुरे सर जळगावकर यांनी रयत सेवाभावी प्रतिष्ठानला कळवली होती.

टिप्पण्या