गांधी निष्टेशी नाते जपणारा विघ्नहर्तचा उपक्रम!*


      मुंबई दि.२:ज्या सत्पुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वाहिले,त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विघ्नहर्ता संस्थेने‌ आयोजित केलेले‌ काव्य स्पर्धेचे आयोजन गांधी निष्ठेशी नाते जोडणारे आहे,असे‌ विचार ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांनी येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना काढले.

      श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गांधी जयंतीच्या औचित्याने कला उपक्रम आयोजित करण्यात येतात.आज परेल येथील सहकारी मनोरंजनाच्या कलादालनात काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाला कथालेखक काशिनाथ माटल प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष दत्ता मोरे होते‌.अभिनेते दिग्दर्शक अभय पैर,कवी नंदू सावंत,नाट्य समीक्षक विजय सक्रे,ज्येष्ठ अभिनेते सुभाष सकपाळ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नाटककार महेंद्र कुरघोडे, नाटककार कविता मोरवणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रथम पारितोषिक सुधारक कांबळी, द्वितीय संदेश गायकवाड, तृतीय सागर सोनावणे,तर उत्तेजनार्थ विभिषण पोशिरकर व जयेश मोरे या विजयी स्पर्धकांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.विद्या निकम यांनी सूत्रसंचालन केले तर महेंद्र दिवेकर यांनी आभार मानले.

टिप्पण्या