बारुळात महिला सक्षमीकरणाची कमाल
प्रतिनिधी, कंधार
----------------------
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बारुळ येथे वर्धिनी फेरीच्या माध्यमातून २४ स्वयंसहाय्यता गट तयार करण्यात आले आहेत. या गटांच्या महिलांना सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या स्वयंसहाय्यता गटांतून जवळपास १५० महिलांना आर्थिक बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वर्धिनींच्या मार्फत प्रत्येक गावात महिला सक्षमीकरणासाठी बळ देण्यात येत आहे. यात बारुळमध्ये २४ स्वयंसहाय्यता गट तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून गरिबी निर्मूलन, विधवा, घटस्फोटीत, अपंग, एकल पंचायत राज महिला सहभाग शाश्वत उपजीविका करण्यासाठी महिलांना सक्षमीकरण करण्यात येत आहे. हे अभियान गेल्या पंधरा दिवसापासून चालू असून त्यात दीडशे महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उपजीविका मिळवण्याचे माध्यम शासनाकडून देण्यात आले. यासाठी वर्धिनी सुषमा चव्हाण, रेखा वाघमारे, गीता परमान, माया वाघमारे, शशिकला वाघाडे हे परिश्रम घेत आहेत.
या अभियानाला तालुका अभियान व्यवस्थापक शिवशंकर चिलगर, प्रभाग समन्वयक नितीन पाटील यांनी उमेद अभियाना मार्फत वर्धिनी सभा ग्रामपंचायत कार्यालय, बारूळ येथे आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना महिलांच्या बळकटीकरणासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा