मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत माती संकलित कलश दिल्लीला रवाना*


नांदेड सायन्स कॉलेज मधील तृतीय वर्षाचा विद्यार्थी लिंगप्पा कपिल साये हा महाविद्यालयातून माती संकलित तयार केलेला कलश घेऊन कुलगुरू महोदय डॉ उद्धव भोसले, रासेयो चे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांच्या आदेशानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने प्रतिनिधित्व करून विद्यापीठांतर्गत दिल्लीला रवाना झाला आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ वेंकटेश जी काब्दे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ. अरुणा राजेंद्र शुक्ला यांच्या हस्ते माती संकलित कलश लिंगप्पा कपिल साये यास सुपूर्त करून विद्यापीठाच्या मार्फत दिल्लीकडे रवाना करण्यात आले. सायन्स महाविद्यालयात शनिवारी हा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ वेंकटेश जी काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ प्रवीण पाटील, सचिव सौ शामल पत्की, उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार जी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कपिल साये लिंगप्पा चांदु यास अमृत कलश घेऊन जाण्यास शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची भरभरून उपस्थिती होती. याप्रसंगी महाविद्यालयात सर्वांनी आनंद व्यक्त केला 

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज