खा. हेमंत पाटील यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घ्या* तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक



       राम दातीर 

माहूर (प्रतिनिधी)

खासदार हेमंत पाटील यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने त्यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करून दाखल गुन्हा मागे घ्या, अशी मागणी शिवसेनेचे माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी दि.6 ऑक्टो. रोजी तहसीलदार किशोर यादव यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

       सुदर्शन नाईक यांच्या निवेदनात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनात समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन केवळ आणि केवळ विकासाभिमुख कार्य केले, समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यास ते कायम तत्पर असतात,आणि त्याच भावानेतून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील ते जाब विचारतात असा उल्लेख केला आहे.विष्णुपुरी च्या शासकीय रुग्णालयात भेटीदरम्यान त्यांचे कर्तव्य त्याची प्रचिती देते, परंतु काहींना ते रुचले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दाखल केलेला गुन्हा सूडबुद्धी व राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचे स्पष्ट करून सुदर्शन नाईक यांनी सदर कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. निवेदनावर माजी उपतालूका प्रमुख हनुमंत मुंडे , संजय जोशी,विकास कपाटे,विनोद सुर्यवंशी पाटील,युवासेनेचे तालुका प्रमुख सोनु चौधरी पाटील,विशाल चौधरी,ज्ञानेश्वर गुजलवार, सुभाष पवार,गंगाराम नागरगोजे,संतोष लिमनकर,सदानंद पुरी,कैलास जाधव,अरविंद राठोड,चिमाजी लिमनकर,गोपाल चव्हान,राहूल आराध्ये आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या