नांदेड:*
च्या विविध मागण्यासाठी आज गेट मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या मिटिंग मध्ये महावितरणचे लाईन स्टाफ सहभागी झाला होता. विविध मागण्यासाठी हे आंदोलन असून त्याचे टप्पे निर्धारित केले आहे. आंदोलनच्या टप्प्यात आजचा दुसरा दिवस होता. आज महावितरण मंडळ तसेच परिमंडळ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ३० ऑक्टोबर रोजी कार्ड कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. तर ६ नोव्हेंबर पासून कुठल्याही प्रकारची वसुली लाईन स्टाफ करणार नाही. वयक्तीक सर्व प्रकारचे वाहन
वापरणे १६ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येतील. त्याच बरोबर २८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत असहकार / कामबंद आंदोलन, ४ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे प्रचंड आक्रोश मोर्चा व १ दिवसाचे धरणा आंदोलन ११ डिसेंबर पासून आझाद मैदान बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात येईल
महावितरण मधील वर्ग ४ ची नोकरीतील इन्ट्रीपोस्ट कायम ठेवून वर्ग ४ मधील शैक्षणीत अर्हता प्राप्त लाईनस्टॉप कर्मचा-यांना वर्ग ३ मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. त्याकरीता यापुर्वी जे पदेह करण्यात आली आहे. ती पदे पूर्ववत सुरू करण्यात यावे उदा. तारमार्ग बांधकाम कार्यदेशक, केबल जॉइंटर मिटर टेस्टर
ग्रेड १/२/३ तारमार्ग निरिक्षक व इतर पदे सुरु करावी. महावितरण कंपनीतील लाइनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूपनिश्चित करण्यात यावे महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांना मागील पगारवाढ करारात नमुद
असलेप्रमाणे फरकासह पेट्रोल भत्ता २० लिटर देण्यात यावा. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी. वसुली हे काम सांधिक रा. स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सुरक्षित साधने व लाईन मेंटनन्स करीता योग्य ते साहीत्य पुरवण्यात यावे. कंत्राटी पध्दतीने नोकरभर्ती न करता सरळसेवा भर्तीने नोकर भर्ती करण्यात यावी. या व्यतीरिक्त प्रत्यक्ष
चर्चेत लाईनस्टाफ च्या काही मुद्यावर / समस्यांवर निराकरण करण्यात यावे. आदी मागण्या त्यांच्या आहेत.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समिती तसेच म. रा. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना, नांदेड यांनी लाईन स्टाप कृती समितीला जाहीर पाठिंबा आहे.संघटना प्रादेशिक सलागार भाई प्रकाश वागरे झोन अध्यक्ष नागेश खिलारे ,झोन उपाध्यक्ष पी बी सुक्रे, सर्कल अध्यक्ष कु शोभा येळणे सर्कल सचिव, सुनिल टिप्परसे, कार्याध्यक्ष एस एम पाटील, सर्व उपस्थिती, होते
addComments
टिप्पणी पोस्ट करा