मुंबई पोर्ट रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना थकीत वेतन देण्यात युनियनला यश


मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वडाळा येथील रुग्णालयात सध्या अल्फाकॉम सर्व्हीसेस या कंपनीचे १२८ कामगार काम करीत असून गेल्या २ महिन्यांचे मासिक वेतन या कंपनीने थकविले होते. 

 दोन महिने पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये खूप असंतोष होता. या अन्यायाविरुद्ध कामगारांनी मुंबई पोर्ट रुग्णालयासमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका या कंत्राटी कामगारांनी घेतली. 

 कंत्राटी कामगार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सभासद असल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध युनियनने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विराज पुरोहित यांना तक्रारपत्र लिहून कळविले होते की, कामगारांना दोन महिन्यांचा थकलेले पगार ताबडतोब द्यावा. मात्र कंत्राटदार पगार देण्यास टाळाटाळ करीत होता, अखेर कंत्राटी कामगारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले . आंदोलनाच्या दणक्याने अखेर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विराज पुरोहित यांनी आपल्या कार्यालयात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विद्याधर राणे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, अल्फाकॉम सर्विसेसचे संचालक यांना बोलवून त्यांच्याबरोबर २० ऑक्टोबर २०२३ रोजी बोलणी करून 

कंत्राटी कामगारांना ऑगस्ट

 महिन्याच्या पगाराची ५०% रक्कम संचालकांने त्याच दिवशी संध्याकाळी बँकेत जमा केली. उर्वरित ५० टक्के रक्कम दुसऱ्या दिवशी बँक खात्यात जमा केली जाईल. तसेच सप्टेंबर महिन्याचा पुर्ण पगार २३ ऑक्टोबर रोजी देण्यात येईल असे लेखी घेण्यात आले. 

  प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी, डाॅ. विराज पुरोहित आणि वरीष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. ज्योती चौधरी यांनी सहकार्य केल्याबद्दल युनियनच्या वतीने धन्यवाद! मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेप्रसंगी शीला भगत, योगिनी दुराफे,संजय बांदिवडेकर, निशा बोरगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपला

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धी प्रमुख  

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या